Jump to content

संजय मंगला गोपाळ : ज्ञान, तंत्रज्ञान, जनचळवळ

From Thane Pages
Revision as of 05:46, 24 November 2025 by thane>Admin
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)

संजय मंगला गोपाळ : ज्ञान, तंत्रज्ञान, जनचळवळ

File:Screenshot 20251111 115139 Google.jpg

संजय मंगला गोपाळ हे नाव म्हणजे विचार, कृती आणि संवेदनशीलतेचा अनोखा संगम. त्यांच्या जीवनाचा प्रवास म्हणजे अम्यास, निष्कर्ष आणि व्यापक जनप्रशिक्षण—या तीन शब्दांत त्यांची ओळख सामावलेली आहे. प्रगतिशील विचारसरणी, सामाजिक परिवर्तनाची निष्ठा आणि विज्ञान-तंत्रज्ञानावर असलेली गाढ श्रद्धा या तिन्हींचा संगम त्यांनी आपल्या जीवनात साधला.

शिक्षण आणि विज्ञानातील योगदान

मुंबईतील व्ही.जे.टी.आय. (Veermata Jijabai Technological Institute) येथे ते प्रथम प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि नंतर तेथे डीन झाले. शिक्षणात त्यांची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नव्हती, तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जबाबदारी आणि सर्जनशील विचार रुजवण्याची होती. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी विश्रांती न घेता समाजपरिवर्तनाच्या कामात स्वतःला झोकून दिले.

आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि प्रयोगशील कार्य

अमेरिकेत जाऊन त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली Renewable Energy, Energy Policy आणि Sustainable Technology या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर पी.एच.डी. पूर्ण केली. पर्यावरणपूरक ऊर्जा, टिकाऊ विकास आणि स्थानिक प्रयोगशील शिक्षण या क्षेत्रांत त्यांनी अनेक अभिनव उपक्रम केले. ठाण्यात त्यांची स्वतःची शाळा "मो. ह. विद्यालय" तसेच अन्य ठिकाणी या विषयाला धरून त्यांनी काही प्रयोग केले.

सामाजिक चळवळींमधील सक्रिय नेतृत्व

सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग तितकाच प्रभावी आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मुव्हमेंट (NAPM) या संस्थांमध्ये त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी निभावली आहे. मेधा पाटकर यांच्या नर्मदा आंदोलनात ते दीर्घकाळ सक्रीय राहिले आहेत. लोकशाही, पर्यावरण, ऊर्जा आणि शिक्षण या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी एक धागा सतत जोडला—मानवकेंद्री विकासाचा.

लेखन आणि संपादनातील बांधिलकी

लेखन हे त्यांच्या कार्याचे आणखी एक अंग आहे. आंदोलन मासिकाच्या संपादनात त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि विज्ञाननिष्ठतेचा ठसा स्पष्ट दिसतो.

मानवकेंद्री प्रगतीचा संदेश

ज्ञान आणि तंत्रज्ञान हे केवळ प्रगतीची निव्वळ साधने नाहीत, तर समाजपरिवर्तनाचीही शक्तिशाली माध्यम आहेत. त्याची धारणा आहे की खरी प्रगती ही प्रयोगशीलतेत, जागरूकतेत आणि लोकांशी जोडलेल्या कार्यात असते.

तुमचे मत, प्रतिक्रिया तुम्ही याच ठिकाणी नोंदवू शकता.

‎<comments />