तुमची आमची सगळ्यांची गरज "वुई नीड यू"
१९८6 मध्ये रुजलेले बीज, आज मोठ्या वृक्षात रूपांतरित
[edit]सुमारे चार दशकांपूर्वी, म्हणजे १९८०च्या दशकात, अतुल गोरे यांच्या पुढाकारातून जयंत कुलकर्णी आणि काही उच्चशिक्षित व्यावसायिक, अभियंते, काही मित्र (डॉ माधव रेगे, संजीव साने इ.) एका समान भावनेतून एकत्र आले. अर्थपूर्ण जीवनासाठी समाजासाठी काहीतरी ठोस करत आले पाहिजे, समाजाला काहीतरी परत देण्याची ती भावना होती. याच निःस्वार्थ भावनेतून ‘We Need You’ या संस्थेचा जन्म झाला.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अतुल गोरे असून अभय कांता हे कार्यवाह तर लतिका सु. मो. या सहकार्यवाह आहेत. जयंत कुलकर्णी संस्थेचे कोषाध्यक्ष आहेत. निलेशचंद्र सिंधकर, जगदीश खैरालिया, प्रा. मीनल सोहोनी, नरेश गायकर आणि प्रा. वृषाली विनायक हे संस्थेचे अन्य विश्वस्त आहेत.
गेली तब्बल चार दशके ही संस्था ठाणे आणि नवी मुंबई परिसरात अविरतपणे कार्यरत आहे. या प्रदीर्घ काळात चालणारी पूर्व प्राथमिक शाळा, बाल विकास मंदिर, याशिवाय पूरक शिक्षणाचे आणि स्त्रियांना रोजगारक्षम बनवण्यासाठीचे अनेक उपक्रम संस्था राबवते. सामाजिक प्रबोधनातही संस्थेने आपली विशिष्ट अशी मुद्रा उमटवलेली आहे. अनेक सामाजिक संस्था उभ्या राहतात आणि लयासही जातात, पण ‘We Need You’ चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे अढळ आणि निरपेक्ष सातत्य. संस्थेने कामात जराही खंड पडू न देता आपले कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. कोव्हिड १९ महामारीच्या काळात जेव्हा सर्व जगाचे काम थांबले होते, केवळ सामाजिक संस्थांचे काम मात्र सर्वत्र जोरकसपणे सुरू होते. 'वी नीड यू सोसायटी'नेदेखील या काळात नवी मुंबई महानगरपालिका तसेच सी. एस. आर. देणाऱ्या कंपन्यांच्या मदतीने भोजन आणि शिधावाटपाचे मोठे काम केले.
नेतृत्वाची व्यावसायिक दृष्टी
[edit]संस्थेचे सर्व विश्वस्त उच्चशिक्षित असून त्यातील काही जण कॉर्पोरेट पार्श्वभूमी असलेले व्यावसायिक आहेत. सामाजिक कार्यासाठी लागणारा वेळ, ऊर्जा आणि स्वतःचा निधी खर्च करण्याची त्यांची तयारी असतेच, पण संस्थेचे काम नियोजनबद्ध रीतीने व्हावे यासाठीही ते आग्रही असतात. परिणामी संस्थेचे रोजचे काम हे विश्वस्तांच्या हस्तक्षेपाशिवाय चालू राहते.
त्यांच्या नेतृत्वाची कार्यपद्धती स्पष्ट आहे:
उत्तरदायित्व: सामाजिक कार्य हे दानधर्म म्हणून नव्हे, तर उत्तरदायित्व म्हणून करायचे.
सामाजिक आणि सामूहिक नेतृत्व:
पारदर्शकता: संसाधनांचा आणि निधीचा काटेकोर व पारदर्शक वापर करणे.
निस्वार्थ काम: प्रकाशझोतात राहण्याची इच्छा नाही; फक्त गरजूंना थेट मदत पोहोचवणे.
त्यांचा विश्वास आहे की, “समाजासाठी केलेले काम हे कर्तव्य असते, कृपा नाही.”
बहुविध कामांची विस्तीर्ण छाया
[edit]गेल्या चार दशकांत ‘We Need You’ संस्थेने समाजाच्या अनेक अंगांना स्पर्श केला आहे. त्यांच्या कामांचे विविध पदर खालीलप्रमाणे आहेत:
१. शिक्षण आणि भविष्याची पायाभरणी: आर्थिकदृष्ट्या कमजोर गटांतील विद्यार्थ्यांसाठी पूरक शिक्षणाचे अनेक उपक्रम. पूर्व प्राथमिक शाळा, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उमंग वर्ग / दिशा वर्ग, शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित, इंग्रजी शिक्षणासाठी खान अकादमी आणि एन.आय.आय.टी.चे मोफत वर्ग, कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करून दहावी पास केलेल्या मुलांना एकलव्य पुरस्कार, त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण चालू राहावे यासाठी पाठ्यपुस्तके आणि अन्य सहकार्य, एकलव्य मुलांच्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी, त्यांच्यात सामाजिक भान जगावे यासाठी आय.पी.एच., स्त्री मुक्ती संघटना, आरोग्यभान आदि संस्थांच्या सहाय्याने अनेक उपक्रमांचे आयोजन. मुलांमध्ये वाचन प्रोत्साहन मोहिमा.
२. आरोग्य व वैद्यकीय सहाय्य: मोफत किंवा सवलतीच्या दरात आरोग्य व वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन. दात, रक्त तपासणी सारख्या विशेष शिबिरांवर भर, गरजूंना औषधे, उपचार करण्यासाठी आर्थिक साहाय्य, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम.
३. महिला सक्षमीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्यविकास प्रशिक्षण. मोफत शिवणकला वर्ग आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण वर्ग, लघुउद्योगांसाठी मार्गदर्शन आणि बाजारपेठेची माहिती. महिलांचे आरोग्य, घरगुती हिंसा आणि कायदेविषयक सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करणे, महाराष्ट्र सरकारच्या मदतीने HIV Aids बद्दल काही शिबिरे देखील घेण्यात आली.
४. आपत्ती व्यवस्थापन व तात्काळ मदत: कोव्हिड-१९ महामारीच्या काळात अन्नधान्य, मास्क आणि औषधे यांचे मोठ्या प्रमाणावर वितरण. नैसर्गिक संकटे (उदा. पूर, आग) आल्यास गरजूंना त्वरित व थेट मदत पुरवणे.
५. जाणीव जागृती प्रयत्न: संगीत, नृत्य, नाटक, फोटोग्राफी यांसारख्या कलांना प्रोत्साहन देणारे उपक्रम. sanvaidhanik साविधानिक मूल्यांवर आधारित कार्यक्रम आणि युथ कट्टा, सत्यशोधक कट्टा आदी मंचांची स्थापना. समाजसंवाद आणि नागरिक सहभाग बैठकांद्वारे सामाजिक ऐक्य टिकवणे.
६. कार्यकर्त्यांचा सत्कार: गेली ५ वर्षे संस्थेच्या वतीने समाजात लक्षणीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, दरवर्षी ३ जणांचा सत्कार समाजव्रती, शिक्षणव्रती, कार्यव्रती हे पुरस्कार देऊन केला जातो.
‘We Need You’ समाजासाठी असलेली एक हाक
[edit]संस्थेचे नाव, ‘We Need You’ (आम्हाला तुमची गरज आहे), हे केवळ घोषवाक्य नाही, तर ते संस्थेचे तत्त्वज्ञान आहे. याचा अर्थ असा की, संस्थेचे कार्य कोणत्याही एका व्यक्तीवर किंवा दात्यावर अवलंबून नाही. ते समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग, प्रत्येक माणसाची मदत आणि समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान आवश्यक मानते. हेच तत्त्वज्ञान या संस्थेच्या चार दशकांच्या सातत्याचे रहस्य आहे.
सामाजिक कार्याचे तत्त्वज्ञान
[edit]जयंत कुलकर्णी आणि ‘We Need You’ संस्थेचा प्रवास हा ‘शांतपणे, पण अमूल्य कार्य’ करण्याचा आदर्श आहे. त्यांनी ‘कॉर्पोरेट शिस्त + सामाजिक बांधिलकी = परिवर्तनाची ऊर्जा’ हे समीकरण ठाणे आणि नवी मुंबई परिसरामध्ये जिवंत ठेवले आहे. आज हजारो कुटुंबे, विद्यार्थी, महिला आणि गरजू वर्ग या संस्थेच्या निःस्वार्थ सेवेने उभे राहिले आहेत आणि हेच संस्थेचे सर्वात मोठे यश आहे.
पूरक शिक्षणासाठी कार्यरत "वुई नीड यू सोसायटी" सारख्या अनेक सामाजिक संस्था वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या राहिल्यास, विकेंद्रित पद्धतीने समाजातील विविध प्रश्न सोडवण्यास सुकर होण्यास मदत होईल. तसेच नागरी समाजाचे सामाजिक भान वाढण्यास मदत होईल.
‘We Need You’ विषयी तुमचे मत, प्रतिक्रिया येथे लिहा.