सुरेंद्र दिघे: आदर्श आणि जिज्ञासू शिक्षण व्रती
सुरेन्द्र दिघे: ठाण्यातील शैक्षणिक आदर्श
[edit]ठाण्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणून सुरेन्द्र दिघे सर ओळखले जातात. सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त या नात्याने ठाण्यातील सरस्वती मराठी शाळेच्या आणि तेथील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे.
जिज्ञासा ट्रस्ट
[edit]सुरेंद्र दिघे हे जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक आहेत. जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे (Jidnyasa Trust, Thane) ही संस्था १९९२ साली स्थापन झाली. जिद्द-ज्ञान-साहस या चित्रसूत्रांवर आधारित गेले जवळ जवळ २० वर्ष काम करत आहे.
विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन; ज्यमध्ये प्रामुख्याने हिमालय आणि सह्याद्री साहस शिबीरे, जिज्ञासा छात्र सेना, विज्ञान केंद्र, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आणि इतर विज्ञान विषयक उपक्रम, शालेय जिज्ञासा हे शालेय मुलांनी, मुलांसाठी संपादित केलेले वार्षिक नियतकालिक, कला शिबीर, निसर्ग आणि पर्यावरण विषयक विशेष उपक्रम, शिक्षण सक्षमीकरण अभियान यांचा समावेश आहे.
पुरस्कार आणि गौरव
[edit]भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे जिज्ञासाला २००८ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच जॉन्सन इंटरनॅशनलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, श्री. आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चैत्र नवरात्रोत्सव २००८ साली गौरवचिन्ह प्राप्त झाले. सौ. सुमिता दिघे आणि श्री. सुरेंद्र दिघे यांना ठाणे नगररत्न पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल नवनिर्माण गौरव पुरस्कार मिळाला.
उपक्रम आणि योगदान
[edit]
This article is not complete & may need editing/corrections. You can make it more factual by adding more content to it..! Please edit..!
Click here to Edit / संपादन करण्यासाठी इथे क्लिक करा