साक्षेपी संपादक आणि माजी खासदार कुमार केतकर
Appearance
कुमार केतकर हे ठाण्याचे रहिवाशी, राज्यसभेतील माजी खासदार (3 April 2018 – 3 April 2024) आणि प्रतिथयश पत्रकार आहेत.
वृत्तपत्रीय कारकीर्द
दैनिक लोकसत्ताचे प्रमुख संपादक, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत या दैनिकांचे माजी मुख्य संपादक, 'डेली आॅब्झर्वर'चे निवासी संपादक आणि इकोनॉमिक टाइम्सचे विशेष प्रतिनिधी
प्रकाशित साहित्य
- बदलते विश्व (लेखमाला, प्रेस्टीज प्रकाशन)
- शिलंगणाचं सोनं (म.टा. मध्ये असतांना लिहिलेल्या अग्रलेखांचा संग्रह १९९४ ते १९९८, मेहता प्रकाशन)
- विश्वामित्राचे जग (अनुभव प्रकाशन)
- ज्वालामुखी तोंडावर
- कथा स्वातंत्र्याची
- त्रिकाल वेध
- वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळात सक्रिय सहभाग
पुरस्कार
- लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार: पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने (इ.स.२०१०)
- पद्मश्री पुरस्कार (इ.स.२००१)
- राजीव गांधी पुरस्कार
- नवरत्न पुरस्कार
- रत्नदर्पण पुरस्कार
- चिंतामणराव देशमुख पुरस्कार: अर्थविषयक लिखाणाबद्दल
- महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) च्या वतीने जीवन गौरव पुरस्कार (इ.स.२०१४)
- Award for journalistic excellence as "Indian Affairs Transformational Journalist of the Decade” at 9th Annual India Leadership Conclave & Awards 2018
राज्यसभेत कुमार केतकर
या लेखाचा मूळ मसुदा मराठी विकिपीडियातील कुमार केतकर या लेखावरून घेतला आहे.