Jump to content

ठाणे शहर

From Thane Pages
Revision as of 06:11, 24 November 2025 by thane>Admin
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)

ठाणे शहर (मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्थानक) ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ठाणे शहराचा कारभार ठाणे महानगरपालिका चालवते.

ठाणे हे तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. शहरात सुमारे ३५ तलाव आहेत. त्यापैकी मासुंदा तलाव आणि उपवन हे तलाव शहरातील पर्यटकांना आकर्षित करतात. या तलावांमध्ये बोटिंग आणि वॉटर स्कूटरची सुविधा आहे, तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात जेल तलाव, ब्रम्हाळा तलाव, मखमली तलाव, कचराळी तलाव, हरीयाली तलाव, आणि गडकरी रंगायतन जवळील मासुंदा तलाव, हे तलाव ठाण्यातील लोकप्रिय मनोरंजन केंद्रे आहेत. मासुंदा तलावाच्या काठावर असलेले कोपिनेश्वर मंदिर हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुने मंदिर आहे अशी आख्यायिका आहे. १७५० मध्ये चिमाजी अप्पांनी बांधलेला उपवन तलाव हे येऊर टेकड्यांवर स्थित एक सुंदर ठिकाण आहे.